भविष्य हा आमचा आवडता विषय आहे. आम्ही भविष्यवेत्ते किंवा होराभूषण किंवा ज्योतिर्विद किंवा तत्सम काहीही नाही. मात्र पुढची अनेक वर्षे ह्या जमातीला मरण नाही एवढं भविष्य मात्र आम्ही अचूक वर्तवू शकतो. ह्याचं कारण म्हणजे लोकांची पंगू मने. ज्यांना वास्तवाचा भार पेलत नाही त्यांना आणि त्यांनाच अशा भविष्यवेत्त्यांच्या कुबड्या लागतात असं आपलं आमचं म्हणणं. अर्थात हे आमचं म्हणणं म्हणजे आमच्या हिचं म्हणणं ह्याच्या विरुद्ध असणार हे ओघानं (किंवा योगानं) आलंच.
एकदा आमची बायको चिंतामग्न बसलेली होती. तिला आम्ही विचारलं तिच्या चिंतेचं कारण, तेव्हा ती म्हणाली की तिला उंदराची चिंता लागून राहिली आहे. हल्ली मी हापिसात फारसे काम नसल्याने मराठी ब्लॉग्ज पठणात माझा वेळ घालवीत असतो. त्यातून भविष्य ह्या विषयावरचे (विनोदी) लेखही वाचत असतो. त्या (अ)ज्ञानाच्या बळावर आम्ही तिला सांगितलं की तिची ही समस्या आम्ही चुटकीसरशी सोडवू शकतो. आम्ही थोडा भविष्याचा अभ्यास सुरू केला असल्याचं तिला ठोकून दिलं. मग तिला आम्ही तिची समस्या विचारली.
ती म्हणाली की घरात एक उंदीर आला आहे आणि तो महाचतुर आहे. ह्या खोलीतून त्या खोलीत पळत असतो. त्याच्या आकाराच्या मानाने त्याला झेपेल ते कुरतडत असतो आणि उंदीर मारण्याच्या औषधाला अजिबात तोंड लावीत नाही. उंदरांसाठी ठेवलेल्या पिंजऱ्यातल्या भज्याची चोरी करून पिंजऱ्यात न अडकताच तो पळून जातो वगैरे वगैरे. आमच्यासाठी भजी न करता आमची ही उंदरांसाठीही भजी करते हे ऐकून आम्हाला अतीव दुःख झालं. पण ते दुःख बाजूला सारून आम्ही तिची ही समस्या कधी सुटणार ह्या कोड्याचं उत्तर प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सोडवायचं ठरवलं.
तिला मी एक आकडा मनात धरायला सांगणारंच होतो, पण तितक्यात मला एक महत्त्वाची गोष्ट आठवली. पळत पळतंच आम्ही स्वैपाकघरात जाऊन कालनिर्णय पाहून आलो. आज अमावस्या नसल्याची खात्री केली. आमचे मित्र दगडूशेट चपटे हे ख्यातनाम ज्योतिषी असल्याचा आव आणत गावभर फिरत असतात. त्यांनीच एकदा आम्हाला सांगितलं होतं की अमावास्येला भविष्य सांगू नये म्हणून. आम्ही त्यांना त्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले की त्या कारणे महिन्यातून एकदा तरी आम्हाला सुट्टी मिळते कामापासून. खरंतर महिनाभरही चपट्यांना काही काम नसतं हे आम्हाला माहीत होतं पण उगाचच त्यांची समाधानाची समाधी कशाला मोडा म्हणून आपलं आम्ही हो म्हटलं. पण आमच्या हिच्यासमोर भविष्यवेत्त्याचं नाटक वठवायचं म्हणून आम्ही आपलं हे अमावास्येचं पाहून घेतलं.
आता आम्ही तिला एक आकडा धरायला सांगितला. माझ्या पत्नीसमोर मीच उभा असल्याने तिच्या मनात बहुतेक ४२० हा आकडा आला. तो तिने आम्हाला सांगितला. वर ह्या आकड्याचा उंदीर घरातून जाण्याशी काय संबंध? असाही एक गूगली टाकला. आमची जवळ जवळ फे फे च उडणार होती. पण दगडूशेटांचं नाव घेऊन आम्ही तिला तिच्या मनात आलेला क्रमांक आणि आताची ग्रहस्थिती, उंदराची कुंडली, आमच्या घराची कुंडली आणि तिची कुंडली ह्याच्याशी कसा (बादरायण) संबंध आहे ते पटवून दिलं आणि कॉम्प्युटरवर जाऊन बसलो. चपट्यांच्या जालपानावर (म्हणजे वेबपेज) जाऊन काही आकृत्या बघितल्या तशाच रेखाटून तासाभराने बाहेर आलो.
आमची ही तिच्या प्रियसखीशी बोलताना दिसली. आम्ही प्रश्नकुंडली मांडून उंदराची समस्या सोडवत असल्याचं प्रियसखीला केव्हाच कळलं होतं. आमच्या ह्या उद्यमशीलतेचं यथास्थित कौतुक झाल्यावर त्या दोघींनी प्रश्नकुंडलीचं उत्तर विचारलं. आम्ही आम्हाला माहीत असल्या नसल्या ग्रहांची नावं घेऊन, त्यात राहू केतू ही अजून दोन नावं टाकून ठोकून दिलं की गुरुवारी उंदीर नाहीसा होईल. भविष्यकथन संपल्यावर गुरुदेवदत्त असं म्हणून वर पाहायलाही मी विसरलो नाही. दगडूशेट चपटेही भविष्यकथन केल्यावर असंच करतात हे आम्ही पाहिलं होतं.
पुढच्या तीन दिवसात आमच्या ह्या भविष्यकथनाची चर्चा घराघरातून व्हायला लागली. काही हुशार मंडळींना खात्री होती की बांबूराव नेहमीच्या पद्धतीने काहीतरी गेम खेळत आहेत पण बऱ्याचशा लोकांचा विश्वासही बसला. येता येता गुरुवार आला. आमची पत्नी कचेरीत गेली. आम्ही गुरुवार असल्याने घरीच होतो. उंदीर काही घरातून जायचे नाव घेईना. आम्हालाही मधून अधून तो फिरताना दिसे. आमची चोरी पकडली जाणार हे स्पष्ट दिसायला लागलं.
आम्ही गुरुवर्य दगडूशेटांचं स्मरण केलं आणि आम्हाला एक कल्पना सुचली. उंदीर ज्या कोपऱ्यात लपून बसला होता, त्या कोपऱ्यात आम्ही बेगॉन स्प्रे चा मारा सुरू केला त्यावर तो पळून दुसरीकडे जाऊ लागला. आम्ही हातात झाडू घेऊन सज्जच होतो. पळपुट्या उंदराच्या बरोबर घाव वर्मी लागला. अजून दोन तीन वेळा झाडू मारल्यावर तो बेशुद्ध झाला आणि (बहुदा) मेला.
आम्ही त्याला तसाच उचलून पिंजऱ्यात टाकला. त्यातलं भजं काढून पिंजरा बंद केला. ते भजं खायचा मोह बाजूला सारून आम्ही दगडूशेटांच चांगभलं म्हणत वर्तमानपत्र वाचत बसलो. संध्याकाळी आमची ही आणि तिची प्रियसखी कचेरीतून घरी आल्या. चहा करायला म्हणून दोघी स्वैपाकघरात गेल्या तोच एक आनंदी चित्कार ऐकू आला.
आमचं भविष्य खरं ठरलं. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी गावभर पसरली. आमच्यावर विश्वास नसलेल्यांचाही आमच्यावर विश्वास बसला. फोन येऊ लागले आणि प्रश्नही विचारले जाऊ लागले. आणि आम्ही आमच्या गावाचे प्रश्नकुंडली तज्ज्ञ झालो. धंदा सध्या जोरात चालू आहे. प्रश्न येत आहेत आम्ही कुंडल्या मांडतो आहोत आणि मोघम उत्तरे देत आहोत. चपट्यांप्रमाणेच एखादं जालपान सुरू करावं असाही विचार आहे. म्हणजे त्यांच्यासारख्याच थापा तिथे मारता येतील आणि आमचा जातकवर्ग वाढत जाईल.
गुरुदेव दत्त! दगडू चपट्याय नमः!!
- बांबुराव
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
धोंडोपंतांच्या ब्लॊगमुळे तुमच्या फ़ारच पोटात दुखायला लागलेलं दिसतय.
अहो, पोटदुखीचा त्रास आम्हाला प्रचंड आहे. शिवाय न पचणारे बनावट पदार्थ खाऊन झालेली पोटदुखी तर बिलकुल सहन होत नाही आम्हाला. शेवटी ब्लॉग पाडावा लागतो बघा.
पण आपण म्हणता तसं कुणा एका व्यक्तीमुळे ही पोटदुखी होत नसून, एकंदरीतच लोकांच्या भाबडेपणाचा दुरुपयोग करण्याच्या प्रवृत्तीमुळे होत असावी. व्यक्तीगत कुणाशी आमचा कुठलाही हेवादावा नाही.
कुठे नामसाधर्म्य अढळल्यास तो योगायोग समजावा.
कुठे नामसाधर्म्य अढळल्यास तो योगायोग समजावा.
झालात का फुस्स्स्स्स...
आले होते मोठे बांबूवाले.
पण झणझणीत ठसका लागावा अगदी मामलेदारच्या मिसळीसारखा असं काही नाही वाचायला मिळालं बुवा. इथे सगळे बाबू लोकं. असं लिहितील की माणूस उकिडवा बसला होता, त्याच्या हातात वर्तमानपत्र होतं, चित्रविचित्र आवाज येत होते, सकाळची वेळ होती, आकाशात हिरवे, पिवळे ढग जमा झाले होते, ते दृश्य बघून कसंसंच वाटत होतं, मनाच्या आभाळावर दुर्गंधीचे ढग मळभ आणीत होते. असं सगळं आजूबाजूचं लिहितील पण एका वाक्यात लिहिणार नाहीत की तो माणूस संडास करून घाण करीत होता.
गांडमें नही गू, हगने चला जुहू. दाखवाच explicit लिहून.
भानू साहेब, ह्यापेक्षा अजून काय एक्स्प्लिसिट लिहायचं बुवा? वाचणार्याने ठरवायचं. पण आधीच म्हटल्याप्रमाणे ही टिप्पणी कुणा व्यक्तीवर नाहीच आहे. त्यात लपवालपवी कसली?
बरं बुवा. राहिलं.
Post a Comment